Home ब्लॉग या मातीतील लोकांनी खूप प्रेम दिले…

या मातीतील लोकांनी खूप प्रेम दिले…

86

नूतन मोरे

ज्येष्ठ श्रेष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्यातील सर्वाेच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी त्यांच्या थोरल्या भगिनी लतादीदी मंगेशकर यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे पुरस्कार मिळणाºया त्या मंगेशकर घराण्यातील दुसºया व्यक्ती ठरल्या आहेत.

आशातार्इंनी आतापर्यंत 16 हजारांपेक्षा अधिक गाण्यांचे गायन केले आहे़ यात मराठी, हिंदी, बंगाली, पंजाबी, तेलतू अशा 20 भाषांचा समावेश आहे़ लावणी, भक्तिगीते, चित्रपटगीते, भावगीते, पॉप, डिस्को या सर्व प्रकारातील गाण्याचे गायन केले असून, देशविदेशातील कोट्यवधी रसिकांचे त्यांनी श्रवण केले आहे.

राज्यातील सर्वाेच्च पुरस्कारप्राप्तीवर त्या म्हणाल्या, की देशाच्या कानाकोपºयातून मला प्रेम मिळाले; पण महाराष्ट्र हा माझा आहे. माहेरच्या मातीतील लोकांनी मला खूप प्रेम दिले. मराठीजनांनी लेकीचे, बहिणीचे, आईचे प्रेम दिले. आजवर अनेक पुरस्कार मिळाले. हा घरचा पुरस्कार मनाला अधिक आनंद देणारा आहे.

आशातार्इंच्या गायन कारकिर्दीत नया दौर, तिसरी मंझिल, उमराव जान, रंगीला असे चार चित्रपट ‘माईल्स स्टोन्स’ ठरल्याचे दिसून येते. विशेष त्यांनी मुकेश, मोहम्मद रफी, किशोर कुमार, कुमार शानू, उदित नारायण या वेगवेगळ्या काळातील गायकांसोबत त्यांनी गायन केले आहे. विशेष म्हणजे आशातार्इंनी 2013 मध्ये ‘माई’ या चित्रपटात भूमिका साकारली आहे.

खासगी आयुष्य
आशातार्इंनी अगदी लहान वयात म्हणजे 16 व्या वर्षी गणपतराव भोसले (1916-1966) यांच्याशी कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. गणपतराव हे लताजींचे वैयक्तिक सचिव होते. हे लग्न अयशस्वी ठरले. पती आणि त्याच्या भावांच्या वाईट वागणुकीमुळे त्या 1960 च्या सुमारास दोन मुले आणि तिसरे बाळ पोटात असताना माहेरी परत आल्या.
यानंतर 1980 मध्ये त्यांनी संगीतकार राहुल देव बर्मन यांच्याशी लग्न केले. हा विवाह राहुल देव बर्मन यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत (1994) टिकला. त्यांनी मागील 8 सप्टेंबर 2020 रोजी वयाची 87 वर्षे पूर्ण केली आहेत.

विविध भाषांमध्ये तब्बल 16 हजार गाणी गायल्यामुळे 2011 साली आशा भोसले यांचे नाव ‘गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवण्यात आले. 5 मे 2008 रोजी भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. सन 2000 मध्ये त्या भारतीय संगीतक्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. त्यांनी सातवेळा फिल्मफेअर पुरस्कारावर आपले नाव कोरले असून, 18 वेळा नामांकनही मिळाले आहे. याशिवाय दोनवेळा आशाताईंना त्यांच्या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. बीबीसीच्या 100 इन्स्पायरिंग वुमन 100 मध्येही त्यांचा समावेश होता.

गाजलेली मराठी गाणी
एक झोका चुके काळजाचा ठोका, आला आला वारा, रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना, ये रे घना ये रे घना, सांज ये गोकुळी, जांभुळ पिकल्या झाडाखाली, मलमली तारुण्य माझे, जय शारदे वागेश्वरी, या रावजी बसा भावजी, स्वप्नात साजना येशील का, नाच रे मोरा, चांदण्यात फिरताना, एकाच या जन्मी जणू, झिनी झिनी वाजे बिन आदी

गाजलेली हिंदी गाणी
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, किसी नजर को तेरा इंतजार (ऐतबार), दिवाना हुआ बादल, ओ मेरे सोना रे, मांग के साथ तुम्हारा, पर्दा है पर्दा, मुझे नौलखा मंगा दे रे (शराबी), ये क्या जगह है (उमराव जान), कर ना सके हम, प्यार कभी कम नही करना, कजरा मोहब्बतवाला, ईक परदेशी मेरा दिल ले गया, प्यार हमारा अमर रहेगा, राधा कैसे न जले (लगान), चुरा लिया है तुमने जो दिल को, प्यार करनेवाले प्यार करते है शान से (शान), सपने में मिलती है (सत्या), आज रपट जाये (नमक हलाल), लेकर हम दिवाना दिल (यादों की बारात), लोग मुझे पागल कहते है (अल्बम), छोटीसी से कहानी से, सिली हवा छूं गयी, पिया बावरी, चाहा था ईक शख्स को (अल्बम), दिल क्या चीज है, साथी तेरे नाम आदी असंख्य.