Home राजधानी मुंबई प्रत्येक वयोवृद्धाला दरमहा दहा हजारांचे सन्मान वेतन द्या, जनता दल (सेक्युलर )...

प्रत्येक वयोवृद्धाला दरमहा दहा हजारांचे सन्मान वेतन द्या, जनता दल (सेक्युलर ) ची मागणी

86

मुंबई : राज्यातील साठ वर्षांवरील प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तींला सरकारतर्फे ‘सन्मान वेतन’ म्हणून दरमहा दहा हजार रुपये देण्यात यावेत अशी मागणी जनता दल-सेक्युलर ( JANATA DAL SECULER ) च्या वतीने करण्यात आली आली. मुंबईतील पक्ष कार्यालयात वयोवृद्ध जनता सन्मान वेतन मोहिमेला सुरवात करण्यात आली.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जी. जी. पारीख यांनी वयोवृद्ध जनतेची नोंदणी करण्यासाठी बनवण्यात आलेल्या आलेल्या लिंकवर सर्वप्रथम आपली सदस्यता नोंदवली. तसेच, जनतेनेही या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केल्याची माहिती मोहिमेचे प्रमुख संयोजक तसेच पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव रवि भिलाणे यांनी दिली.

जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शरद पाटील यांच्या निर्देशानुसार राज्यातील लाखो वयोवृद्धांना मोहिमेत सामील करून घेण्याचा संकल्प पक्षाच्या वतीने करण्यात आला असून प्रदेश महासचिव प्रताप होगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वयोवृद्ध जनता सन्मान वेतन मोहीम सदस्य नोंदणी लिंकचे उद्घाटन करण्यात आले. समाज माध्यम ( SOCIAL MEDIA ) तसेच सभा, मेळावे आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लाखो वयोवृद्धांना सदस्य करून घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

समारंभाला मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, महासचिव ज्योती बडेकर, ठाणे जिल्हाध्यक्ष धनाजी सुरोसे, विजय त्रिभुवन, कामगार नेते सीताराम लव्हांडे, मुंबई सचिव संदेश गायकवाड, मतीन खान, प्रशांत राणे,फारूक मापकर,सतीश सत्ते, प्रशांत राणे, आर. आर. चांदणे आदी मान्यवर उपस्थित होते.

सध्या अनेक खेडे, पाड्यात, झोपडपट्ट्यांमध्ये उदरनिर्वाहाचे साधन नसलेले लाखो वयोवृद्ध लोक भणंग आयुष्य जगत आहेत. त्यांना इच्छा असली तरी त्यांच्या कुवतीला झेपेल, असे काम मिळत नाही. त्यामुळे देशाला युवापिढी देणाºया या वयोवृद्धांना सन्मानपूर्वक जगता यावे, यासाठी सरकारनेच जबाबदारी घ्यावी यासाठी ही मोहीम सुरू करत असल्याचे रवि भिलाणे यांनी म्हटले आहे. या मोहिमेत सामील होऊ इच्छिणाºयांनी ९५९४४५२८०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.