Home उपराजधानी नागपूर आता उन्हाचा पाराही म्हणतोय, घरातच थांबा…विदर्भाचे तापमान चाळीशी पार

आता उन्हाचा पाराही म्हणतोय, घरातच थांबा…विदर्भाचे तापमान चाळीशी पार

103

नागपूर : संपूर्ण राज्यावर कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सरकारकडून नागरिकांना घराबाहेर न पडल्याचे, सर्व नियमांचे पालन करण्याचे पोटतिडकीतून आवाहन करण्यात येत आहे. मात्र, बहुतांश लोक त्याचे पान करत नसल्याचे दिसून येते. आता कडक उन्हानेही लोकांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे. कारण विदर्भासह संपूर्ण राज्याचे तापमान [ temperature in vidarbh ] वाढत आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला वाढलेले तापमान काही अंशी कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा पारा वाढला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशी
पार गेला आहे. उन्हामुळे नागरिकांच्या शरीराची लाहीलाही होत असल्याने उष्णाघाताचा धोका टाळण्यासाठी उन्हात घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. कारण उद्या 30 मार्च आणि 31 मार्च रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान 42 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. चेहरा झाकण्यासाठी रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा, त्याचबरोबर दिवसभरात भरपूर पाणी प्यावे, असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

कोरोनाच्या साथीला तप्त उन्हंही [ corona and hot temperature]
राज्यात मागील 28 मार्चपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
15 एप्रिलपर्यंत हे नवे निर्बंध लागू करण्यात आल्याचे आदेश राज्य शासनातर्फे देण्यात आले आहेत. रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडू नये, पाच जणांपेक्षा अधिक माणसांनी एकत्र बाहेर पडून नये यावर बंदी घातली आहे. मुखावरण ( mask ) न लावल्यास, रस्त्यावर थुंकल्यास, शारीरिक दूरता (सोशल डिस्टन्सिंग) अशा नियमांचे पालन न करणाºयास तातडीने जागच्या जागी दंड करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुखावरण न लावता कुणीही व्यक्ती आढळली तर 500 रुपयांचा दंड करण्यात येणार असून, रस्त्यावर थुंकल्यास 1000 रुपये वसूल करण्यात येतील. मात्र, काही समाजात वेगाने पसरत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाला ही लोक हातभार लावत आहेत. विनाकारण घराबाहेर पडून प्रशासनासमोर समाजविरोधी भूमिका पार पडत असल्याचे दिसून येते. संचारबंदीच्या वेळेतही अनेक शहरात घराबाहेर रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत असल्याचे दिसून आले आहे़ यात महिलांचा अधिक सहभाग आहे. काही कुत्र्यांना बाहेर फिरवत असल्याचे ‘अभिवृत्त’ला दिसून आले आहे. त्यामुळे अशा लोकांविरोधात आता आपत्ती व्यवस्थापन आणि महामारी आजार कायद्यानुसार कारवाई करण्याची वेळ आली आहे.

सोमवारी काही शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

अकोला ……………………..42.8
अमरावती …………………..41.8
बुलढाणा……………………..40.0
ब्रम्हपुरी………………….. …43.3
चंद्रपूर………………………..42.8
गडचिरोली…………………….38.8
गोंदिया……………………….40.8
नागपूर………………………..41.5
वर्धा ………………………….42.0
वाशिम…………………………39.2
यवतमाळ………………………42.5