Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय भरधाव ट्रक दुकानात शिरला, सात मृत्युमुखी

भरधाव ट्रक दुकानात शिरला, सात मृत्युमुखी

32

पाटणा : बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील भीषण अपघातात [ accident ] मिठाईच्या दुकानात शिरलेल्या ट्रकने अनेक लोकांना धडक दिली यात सातजणांचा जागीच मृत्यू झाला, तर 12 पेक्षा जास्त जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
माहितीनुसार, सदर अपघात तेल्हाडा गावात घडला असून, गावातील मधातूनच मार्ग गेलेला आहे़ त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुकाने वसलेली आहेत. दरम्यान, वेगाने आलेल्या ट्रकने सात चिरडले़ यात सातजणांचा मृत्यू [ sevan dead ] झाला़ यानंतर संतापलेल्या जमावाने ट्रकला पेटवले. तसेच, पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. याशिवाय ठाण्याबाहेरील वाहनांनाही पेटवून दिले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतकांच्या वारसांना आर्थिक मदत घोषित केली आहे.

आमची भूमिका
अत्यंत दुर्दैवी घटना असून, वाहनचालकाच्या बेजबाबदारपणाने अपघात घडल्याचे प्राथमिकरित्या दिसून येते. छायाचित्रानुसार घटना ही गावात घडलेली आहे. गावातूनच रस्तामार्ग गेलेला दिसून येतो. कदाचित रस्त्यावर ‘स्पीडब्रेकर’ नसेल. (आणि असले तरी ते काही महाभाग खोदून टाकतात.) याशिवाय अनेक वाहनचालकांना गावातून वाहन नेताना अधिक हुरुप येतो. मानसिकता एकदम बदलून जाते. परिणामी वेगाला रोखण्यात अपयश आल्याने अशाप्रकारे अपघात घडून येत असतात. शेवटी अपघात हे मानसिकता बदलल्यानेच घडून येत असतात, यात दुमत असू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here