Home पूर्व विदर्भ चंद्रपूर 43.6 अंश, विदर्भातील सर्व जिल्हे 40 अंशांवर पार

चंद्रपूर 43.6 अंश, विदर्भातील सर्व जिल्हे 40 अंशांवर पार

88

नागपूर : संपूर्ण विदर्भाचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार गेले असून, कोळसा खाणींचा जिल्हा चंद्रपूर येथे आज कमाल तापमान 43.6 अंश इतके होते. तर, सर्वात कमी म्हणजे 41.0 अंश इतक्या तापमानाची नोंद वाशिम आणि बुलढाणा येथे झाली.

प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, मंगळवारी विदर्भातील संपूर्ण जिल्ह्याचा तापमान आकडा 40 अंशांच्या पलिकडे गेला असून, चंद्रपुरात 43.6 अंश तर ब्रम्हपुरी येथे 43.0 अंशांची नोंद झाली. अन्य शहरात अकोला येथे 41.7 अंश, अमरावती 42.2 अंश, गडचिरोली तसेच गोंदिया येथे प्रत्येकी 42.0 अंश, नागपूर येथे 41.9 अंश, वर्धा 42.2 अंश, तसेच यवतमाळ येथे 41.7 अंश सेल्सिअसची [ degree celsius ] नोंद झाली.

हेही वाचा :

बेजबाबदारीची हद्द : कोरोनाबाधित कामगारांचा परप्रांतात प्रवास
रूपं बदलणारा विषाणू आणि स्वरूप बदलणारी गुन्हेगारी यांच्याशी  लढण्याचे पोलिसांचे शौर्य गौरवास्पद