Home उपराजधानी नागपूर लसीकरण वाढविण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार  करावा : गृहमंत्री

लसीकरण वाढविण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार  करावा : गृहमंत्री

36
प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर : ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात  वाढत असून यामध्ये काटोल, नरखेड, सावनेर,कामठी, हिंगणा आदी क्षेत्रात तपासण्यांचे प्रमाण व लसीकरण वाढविण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार  करावा, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख [ HOME MINISTER ANIL DESHMUKH ] यांनी दिल्या.

कोरोनाग्रस्त जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच  लसीकरण केंद्र वाढविणे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे बेडची संख्या वाढवून रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देणे यासोबतच खासगी रुग्णालयात शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार उपचाराची सुविधा आदीबाबत लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या.

जिल्ह्यात सरासरी अडीचशे लसीकरण केंद्र आहेत.  यापैकी शहरात 81 तर ग्रामीण भागात 163 केंद्रे आहेत. सहा लाख नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्रांची संख्या  वाढविणे आवश्यक आहे. लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन त्यांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महापौर तिवारी यांनी शहरात कोविड रुग्णांसाठी तात्काळ  पाचशे बेड वाढविण्याची आवश्यकता आहे. यासोबतच बाधित रुग्णांना रेमडिसिव्हीर इंजेक्शन देण्यासाठी स्वतंत्र रुग्णालय असावे. गृहविलगीकरणातील  रुग्णांना योग्य मार्गदर्शन करुन उपचार केल्यास बेडची संख्या वाढवू शकेल असे यावेळी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी बाधित रुग्णांना ग्रामीण भागात गृह विलगीकरणासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे क्वारंटाईन केंद्र सुरु करुन अशा रुग्णांची व्यवस्था करावी, अशी सूचना केली. खासदार डॉ. महात्मे यांनीही विविध सूचना केल्या.

मुंबई, ठाणे, पुणे यानंतर नागपूरमध्ये लसीकरण चांगले झाले, असून जिल्ह्यात 3 लाख 59 हजार 953 लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात केंद्राची संख्या वाढवून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी दिली.

प्रारंभी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी लसीकरण मोहीम, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यावर विशेष भर देण्यात आला आहे. लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी नागरिकांना बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले असून प्रत्येक केंद्रावर  दोनशेपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागात 163 केंद्राद्वारे लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून तपासणी वाढविण्यात आली आहे. कोरोनाच्या सर्वाधिक रुग्ण असलेल्या भागात  4 हजार 402 कन्टोन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. ज्या गावात पाचपेक्षा जास्त रुग्ण आहेत अशा तालुक्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कळमेश्वर- 41, काटोल-20, सावनेर-64, नागपूर ग्रामीण-30, मौदा-10 हिंगणा -21, पाशिवनी-14, कामठी-21 या गावांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

 

राज्यात कडक टाळेबंदी लावण्याच्या प्रस्तावाला यांनी केला विरोध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here