Home राष्ट्रीय ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

36

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना चित्रपट अभिनय क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार [ DADASAHEB FALAKE PURSKAR ] जाहीर झाला आहे.

रजनीकांत [ RAJANIKANT ] यांचे मूळ नाव शिवाजीराव गायकवाड [ SHIVAJIRAO GAIKAWAD ] असून, ते मुळचे महाराष्ट्रीयन आहेत. त्यांनी हिंदी, कन्नड, तेलगू, तामिळ चित्रपटांत अभिनय साकारला आहे. याशिवाय ते आपल्या चाहत्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.

यंदाचा 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कारकत्यार्ची निवड करण्यासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले, संगीतकार, गायक शंकर महादेवन् यांच्यासह एकूण पाच जणांची समिती तयार करण्यात आली होती. या समितीच्या बैठकीत सर्वसंमतीने अभिनेते रजनीकांत यांना हा पुरस्कार देण्याची शिफारस केली, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
त्यांच्यावर देशविदेशातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अभिनंदन केले आहे. आपणास चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानाचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.आपले चित्रपटसृष्टीतील योगदान अतुलनीय आहे. आपण रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवित आहात. आपणास रसिकांचे प्रेम असेच मिळत राहो. आपले हार्दिक अभिनंदन, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here