Home राजधानी मुंबई घरकुलाबरोबर शौचालय, गॅस, नळ आणि वीजजोडणीही

घरकुलाबरोबर शौचालय, गॅस, नळ आणि वीजजोडणीही

45

मुंबई : घरकुल बांधणीबरोबरच लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी घरकुल योजनांचा इतर शासकीय योजनांशी कृतीसंगम करण्यात येत आहे.

अभियान कालावधीमध्ये पूर्ण झालेली घरकुले तसेच आधीच्या काळात पूर्ण झालेली परंतु कृतीसंगमाचा लाभ न मिळालेल्या घरकुलांनादेखील अभियान कालावधीत त्याचा लाभ देण्यात आला. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 4 कोटी 6 लाख 37 हजार 201 इतके मनुष्यदिवस निर्मिती करण्यात आली. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत 6 लाख 37 हजार 974 लाभार्थ्यांना घरकुलासोबत शौचालयाचा लाभ मिळवून देण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत 4 लाख 68 हजार 351 लाभार्थ्यांना नळाद्वारे पाणीपुरवठ्याचा लाभ  देण्यात आला, प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत 3 लाख 47 हजार 751 लाभार्थ्यांना गॅस जोडणीचा लाभ देण्यात आला, सौभाग्य योजनेअंतर्गत 3 लाख 19 हजार 648 लाभार्थ्यांना वीज जोडणीचा लाभ देण्यात आला. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत 3 लाख 44 हजार 834 लाभार्थ्यांना उपजिवीकेचे साधन मिळवून देण्यासाठी काम केले आहे, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

बहुमजली इमारतीघरकुल मार्टलाही चालना

अभियानामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांचाही समावेश करण्यात आला असून यामध्ये पुरेशी जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी बहुमजली इमारती निर्माण करण्यात येत आहेत. आजअखेर 921 बहुमजली इमारतींची (जी+2) निर्मिती करण्यात आली  आहे. तसेच जेथे पुरेशी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी सर्व सोयीसुविधांनी युक्त 193 गृहसंकुल उभारण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाचे साहित्य एकाच छताखाली व जवळच उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यामध्ये घरकुल मार्ट तयार करण्याचे काम सुरु असून आजअखेर 343 तालुक्यांमध्ये घरकुल मार्ट उभारण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना अधिक सोयीसुविधायुक्त घरकुल बांधकामासाठी बँकेचे 70 हजार रुपये कर्ज स्वरुपात मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आजअखेर 2 हजार 172 लाभार्थ्यांना विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज मिळवून देण्यात आले आहे. मुलभूत सुविधांद्वारे (अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पथदिवे, नळजोडणी इत्यादी) 19 हजार 301 आदर्श घरकुलांची उभारणीही अभियान कालावधीत करण्यात आली, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

यापुढील काळातही घरकुल बांधकामांचे महाआवास अभियान मिशन मोडवर राबवून ग्रामीण भागातील सर्व बेघरांना आदर्श पद्धतीची घरकुले उपलब्ध करुन देण्यात येतील. अभियानात सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी सहभाग घेऊन ते यशस्वी करावे, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here