Home विदर्भ यवतमाळ कोरोनसंबंधी चाचणी गांभीर्याने घ्याव्यात : विभागीय आयुक्त

कोरोनसंबंधी चाचणी गांभीर्याने घ्याव्यात : विभागीय आयुक्त

23

यवतमाळ : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात मृत्यू आकडा चार पटीने वाढला आहे. शिवाय कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. ही अतिशय गंभीर बाब असून, मृत्यू आणि पॉझिटीव्हीटी दर कमी करण्यासाठी चाचणी प्रक्रिया करा, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीसंबंधी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

आयुक्त श्री. सिंह म्हणाले, की अमरावती विभागात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळमध्ये मृत्यू जास्त होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी राज्याच्या टास्क फोर्ससोबत नियमित संपर्क ठेवावा. यवतमाळ, दिग्रस, दारव्हा, पुसद, महागाव, वणी, केळापूर आदी भागात सर्व्हेलन्स, टेस्टिंग आणि प्रतिबंधित क्षेत्राची सीमा वाढवावी.

1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यात लसीकरणाची गती अतिशय कमी असल्याचे सांगून श्री. सिंह म्हणाले, की पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सचे 100 टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, नगर पालिका प्रशासन, पंचायत राज व्यवस्था आदी विभागांचे केवळ 85 टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले. लसीकरणाची गती वाढविली नाही तर पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होणार नाही. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, न.प. मुख्याधिकारी यांच्यासह संपूर्ण यंत्रणेवर जबाबदारी सोपवण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here