Home पूर्व विदर्भ लाच स्वीकारल्याचे सिद्ध झाल्याने कनिष्ठ अभियंत्याला कारावास, दंडही

लाच स्वीकारल्याचे सिद्ध झाल्याने कनिष्ठ अभियंत्याला कारावास, दंडही

117

गोंदिया : लाच स्वीकारल्याचे सिद्ध झाल्याने गोंदिया पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी कनिष्ठ अभियंता आरोपी ओमप्रकाश चुन्नीलाल डहाट यांना कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

तक्रारदाराने केलेल्या विहिरीच्या बांधकामाचे बिल तयार करून पंचायत समिती, गोंदिया येथे मंजुरीसाठी पाठविण्याकरिता आरोपी ओमप्रकाश चुन्नीलाल डहाट यांनी तक्रारदारास 1500 रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारली होती. यानंतर त्यांच्याविरुद्ध 7 आॅगस्ट 2015 रोजी गोंदिया शहर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते

विशेष न्यायाधीश उदय बी. शुक्ला यांच्या न्यायालयात सदर खटला चालविण्यात आला. सुनावणीदरम्यान 30 मार्च 2021 रोजी न्यायालयाने आरोपी ओमप्रकाश चुन्नीलाल डहाट यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक [ ACB ] कायदा कलम 7 नुसार चार वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक दिलीप वाढणकर यांनी पूर्ण केला होता. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. कैलाश खंडेलवाल यांनी काम पाहिले. त्यांना पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोहव प्रदीप तुळसकर यांनी सहाय्य केले.