Home पूर्व विदर्भ मंडळ अधिकाºयाने स्वीकारली दीड हजारांची लाच, गुन्हा दाखल

मंडळ अधिकाºयाने स्वीकारली दीड हजारांची लाच, गुन्हा दाखल

136

चंद्रपूर : भद्रावती तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रशांत नरेंद्रप्रतापसिंह बैस, यांनी 1,500 रुपयांची लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक ( ACB) विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणातील तक्रारदार चंदपूर येथील रहिवासी असून, त्यांनी साजा चंदनखेडा मौजा चरूर घारापुरी येथील सर्व्हे क्रमांक 129/2 मधील 1 हेक्टर 62 आर जमीन खरेदी केली आहे. सदर खरेदी केलेल्या जमिनीचे फेरफार करून देण्याच्या कामाकरिता तक्रारदार यांनी तहसील कार्यालय येथे रितसर अर्ज केला होता. त्या कामासाठी तक्रारदार यांनी बैस यांची भेट घेतली असता त्यांनी फेरफार करून देण्याच्या कामाकरिता 2,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली; परंतु तक्रारदार यांना मंडळ अधिकाºयाला लाच देण्याचे योग्य न वाटल्याने त्यांनी चंद्रपूर येथे एसीबी अधिकाºयांना भेटून तक्रार नोंदविली़ यानंतर पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांनी अत्यंत गोपनीयरित्या तक्रारीची शहनिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले. यात1 एप्रिल 2021 रोजी पडताळणीदरम्यान बैस यांनी फेरफार कामाकरिता दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडअंती 1500 रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद तोतरे (एसीबी नागपूर) यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक अविनाश भामरे, पोहवा मनोहर एकोणकर, नापोकॉ. अजय बागेसर, संतोष येलपूलवार, पो.कॉ,रोशन चांदेकर, रवी ढेगळे, समीक्षा भोगळे, चापोकॉ सतीश सिडाम यांनी कार्यवाही सहभाग घेतला.