Home उपराजधानी नागपूर नागपूरमधील सुनंदा सालोटकर यांना ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार’जाहीर

नागपूरमधील सुनंदा सालोटकर यांना ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार’जाहीर

49

नागपूर : शेतीक्षेत्रातील सर्वोच्च ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार’ (२०१९) बारामती तालुक्यातील पिंपळी येथील राजेंद्र दिनकर पवार आणि नागपूर जिल्ह्यातील सोनेगावमधील सुनंदा संतोष सालोटकर यांना जाहीर झाला आहे़ यासंदर्भातील घोषणा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी केली.

राज्यात दरवर्षी शेती आणि पुरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी अथवा संस्थेला राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येते़ कृषिमंत्री दादाजी भुसे [ agriculture minister dadaji bhuse ] यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत २०१८ आणि १९ या दोन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात नागपूर जिल्ह्यातील सुनंदा सालोटकर यांचा समावेश आहे.

याशिवाय सन २०१८ वर्षांसाठीचा पुरस्कार सांगली जिल्ह्यातल्या आष्टा येथील संजीव गणपतराव माने यांना जाहीर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here