Home राष्ट्रीय यापुढे रेल्वेमध्ये मोबाईल, लॅपटॉप चार्ज करण्यावर बंदी

यापुढे रेल्वेमध्ये मोबाईल, लॅपटॉप चार्ज करण्यावर बंदी

97

नवी दिल्ली : मागील काही दिवसांत रेल्वेगाड्यांमध्ये आगीच्या घटना ( fire in train coach ) घडत असल्याने रेल्वे विभागाने रात्रीच्या प्रवासात मोबाईल तसेच लॅपटॉप चार्ज करण्यावर बंदी आणली आहे.

मागील 13 मार्च रोजी चार्जिंग सॉकेटमुळे [ charging points ] डेहराडूनला जाणाºया शताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्याल आग लागली होती. यावेळी आगीने सात डबे आपल्या कवेत घेतले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर काही दिवसांनी रांची स्थानकात उभ्या असलेल्या एका मालगाडी इंजिनला आग लागली होती. त्यामुळे रेल्वे प्रवासावेळी रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेदरम्यान चार्जिंग करणारे सर्व इलेक्ट्रिक पॉर्इंट बंद ठेवणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. अनेकजण तर रात्रभर मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगला ठेवत झोपून जातात. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास रात्रीच्या झोपेत काही कळत नाही.