Home राजधानी मुंबई संपूर्ण राज्यावर लॉकडाऊनची टांगती तलवार, मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

संपूर्ण राज्यावर लॉकडाऊनची टांगती तलवार, मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

72

मुंबई : कोरोनासंबंधी सर्व उपाययोजना करण्यात येत असून, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही. येत्या दोन दिवसांत सरकार याबाबत निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा स्फोट झाल्याने त्याला नियंत्रित करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM UDHHAV B THAKARE) यांनी आज रात्री साडेआठच्या सुमारास जनतेशी संवाद साधला.

दोन दिवसात कोरोना संसर्ग नियंत्रित झाल्याचे दिसून न आल्यास लॉकडाऊनचा ( LOCKDOWN ) निर्णय घ्यावा लागणार आहे़ आपण हा निर्णय टाळू शकतो. येत्या दोन दिवसांत आणखी काही तज्ज्ञांशी बोलणार. लॉकडाऊनव्यतिरिक्त इतर पर्यायावर विचार करून ठरविण्यात येईल, असे स्पष्ट करत नागरिकांचा जीव महत्त्वाचा असल्याने यात राजकारण करू नका, असे आवाहन राजकीय पक्षांना केले.

मागील काही दिवसात लग्न सोहळे, राजकीय मोर्चे, अन्य कार्यक्रम थाटामाटात साजरे झाले. मात्र, मार्चच्या आधीपासून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात कोरोनाने (CORONA ) अक्राळ विक्राळ रुप धारण केले असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

 

अन्य बातम्या :

यापुढे रेल्वेमध्ये मोबाईल, लॅपटॉप चार्ज करण्यावर बंदी

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रियंका गांधी होम क्वारंटाईन 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here