Home BREAKING NEWS विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रियंका गांधी होम क्वारंटाईन 

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रियंका गांधी होम क्वारंटाईन 

51

नवी दिल्ली : देशात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणूक सुरू असतानाच काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी [ PRIYANKA GANDHI ] यांना होम क्वारंटाईन [ HOME QUARANTINE ] व्हावे लागले आहे.

सध्या देशात अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची [ VIDHANSABHA ELECTION ] रणधुमाळी सुरू आहे. देशातील विविध राजकीय पक्ष आणि स्टार कॅम्पेनर निवडणूकीच्या मैदानात उतरून आपल्या पक्षासाठी प्रचार करत आहेत. सध्या पश्चिम बंगालमध्ये, आसाम अशा राज्यांमध्ये मतदान सुरू असून अनेक राजकीय पक्षांनी आपला मोर्चा आसाम, तामिळनाडू आणि केरळ राज्यांकडे वळवला आहे. अशातच काँग्रेस पक्षाच्या स्टार कॅम्पेनर प्रियंका गांधी यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली आहे. या चाचणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी तज्ज्ञांच्या सल्ल्यावरून होम क्वारंटाईन झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here