Home राजधानी मुंबई महाआवास अभियानाला १ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ : मंत्री मुश्रीफ

महाआवास अभियानाला १ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ : मंत्री मुश्रीफ

25

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागात घरकुल बांधकामांना चालना देण्यासाठी तसेच त्यात गुणवत्ता आणण्यासाठी १ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
सूत्रानुसार, २० नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या साधारण साडेचार महिन्यांच्या कालावधीत राबवलेल्या महाआवास अभियानाला मोठे यश मिळाले आहे. पंतप्रधान आवास योजना, राज्यपुरस्कृत घरकुल योजनांमधून या काळात ७ लाख ४१ हजार ५४५ घरकुलांचे बांधकाम केले आहे. त्यापैकी ३ लाख ६२१ घरकुल बांधून पूर्ण झाली आहेत, तर ४ लाख ४० हजार ९२४ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. चालू महिन्याअखेर पूर्ण केले जाईल, अशी माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

अन्य बातम्या :

संपूर्ण राज्यावर लॉकडाऊनची टांगती तलवार, मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

यापुढे रेल्वेमध्ये मोबाईल, लॅपटॉप चार्ज करण्यावर बंदी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here