Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय छत्तीसगडमध्ये चकमकीत 22 जवानांना वीरमरण

छत्तीसगडमध्ये चकमकीत 22 जवानांना वीरमरण

33
बीजापूर : छत्तीसगडमध्ये बीजापूर जिल्ह्यातील जोनागुडा परिसरात शनिवारी झालेल्या चकमकीत 22 जवानांना वीरमरण आल्याचं समोर आलं आहे.
सुकमा-बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवर जगरगुंडा क्षेत्रात आज सकाळी आणखी २० जवानांचे मृतदेह आढळले. २५ हुन अधिक जवान जखमी झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली. तसेच सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंह यांना चकमकस्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.या भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी दडले असल्याच्या गोपनीय माहिती आधारे सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू होती. त्या दरम्यान सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये काल चकमक झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here