Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

79

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन झालं आहे. वयाच्या 88 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 60 आणि 70 दशकात त्यांनी सहायक अभिनेत्री म्हणून भुमिका पार पाडली. त्यांनी 100 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या भुमिकेने चाहत्याच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. हसरा चेहरा, कामातील उत्साह, आणि नवोदितांना सतत पाठींबा देण्यात शशिकला [ actress shashikala ] यांचे योगदान मोठे होते. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1932  रोजी सोलापुरात झाला होता.