Home राजधानी मुंबई दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

37

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आज गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे पाटील [ HOME MINISTER DILIP VALASE PATIL] यांची नवे गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी याआधीही गृहमंत्रिपद सांभाळले होते. त्यामुळे अशा महाविकास आघाडी सरकार अडचणी असताना अनुभवी अशा नेत्याकडे गृहमंत्रिपद देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. श्री.वळसे-पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.