Home मुंबई मोठ्ठी बातमी, अनिल देशमुख न्यायालयीन लढाई लढणार

मोठ्ठी बातमी, अनिल देशमुख न्यायालयीन लढाई लढणार

53

मुंबई : गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख [ Anil Deshmukh ] यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे़ ते आज रात्रीच नवी दिल्लीला रवाना होणार आहे़
माजी पोलिस अधिकारी परमबीर सिंग यांनी आरोप केल्याच्या प्रकरणात अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे; परंतु ते आता न्यायालयीन लढाईसाठी मैदानात उतरले आहे. नवी दिल्लीत ते पक्षाच्या नेत्यांसह वकील मंडळींचीही भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला निर्देश दिले आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. सदर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांनी स्वत: हून राजीनामा दिला आहे. त्याआधी शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यात बैठक पार पडल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here