Home राष्ट्रीय न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा नवे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा नवे सरन्यायाधीश

78

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज देशाचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा यांची नियुक्ती केली आहे. ते येत्या 24 एप्रिल रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील.

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे [ chief justice s a bobde] येत्या 23 एप्रिल रोजी निवृत्त होणार असून, त्यांनी गेल्या महिन्यात न्यायमूर्ती रामण्णा यांची त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती. ते 26 आॅगस्ट 2022 पर्यंत पदाची जबाबदारी सांभाळतील. एक वर्ष चार महिन्यांचा हा कालावधी आहे. आंध्र प्रदेशातील ते दुसरे सरन्यायाधीश आहेत. यापूर्वी 1966-67 मध्ये न्यायमूर्ती के. सुब्बा राव यांनी नववे सरन्यायाधीश म्हणून पद सांभाळले आहे.

दरम्यान, एन. व्ही. रामण्णा [ justice  n v ramanna ] यांची 27 जून 2000 रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. 10 मार्च ते 20 मे 2013 या काळात त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळली. 2013 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आणि 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये न्यायमूर्ती रामण्णा यांनी भूमिका बजावली आहे.