Home रानशिवार मानसिक तणावनाशक तुळस…

मानसिक तणावनाशक तुळस…

76

तुळस आपल्या घरातील महत्त्वाचं झाडं. प्रत्येकाच्या अंगणात तिचं अस्तित्व असतं. पर्यावरणासह धार्मिकदृष्टीनेही तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विशेष म्हणजे आरोग्यवर्धक वनस्पती [ Health Benefits of Tulsi Plant ] म्हणून तिचे स्थान आहे.

हदयरोग, अ‍ॅलर्जी, इन्फेक्शन, लठ्ठपणा, खोकला, त्वचारोग, दंतदुखी अशा अनेक त्रासांवर तुळस अत्यंत उपयुक्त मानली जात असून त्याचा वापर रक्तशुद्धीकरणासाठीही होतो. तुळस घरात असल्याने आॅक्सिजनची कमतरता कधीच घरात जाणवत नाही, म्हणजेच शुद्ध हवा खेळती राहण्यास मदत होते. तसेच तिच्या पावित्र्यामुळे आपलेही जीवन सुखी होऊन जाते.

या धावपळीच्या जगात बरेच लोक मानसिक त्रासातून जात असल्यामुळे ते नकळतच तणावयुक्त जीवन जगताना दिसतात. ब-याचदा औषधांचा काहीही उपयोग न झाल्याने ते लोक घरगुती उपचार करतात. तुळशीच्या पानांमध्ये ‘अ‍ँटीस्ट्रेस’सारखे घटक उपलब्ध असतात. त्यामुळे ते माणसाला मानसिक तणावातून मुक्त करतात. तसेच तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तणावातून येणाºया नकारात्मक विचारांवर मात करणे देखील सोपे होते. तुळशीची पाने डोकेदुखीवरील रामबाण उपाय म्हणून ओळखली जातात. तुळशीच्या वाळलेल्या पानांची गरम पाण्यात वाफ घेणे हा सर्वात चांगला उपाय मानला जातो. त्यासाठी एक चमचा वाळलेली तुळशीची पाने दोन कप पाण्यात टाकून एका मोठ्या भांड्यात गरम करावे. एका चौरस कपड्याने चेहरा झाकून त्याची 5 ते 10 मिनिटे वाफ घ्यावी. याशिवाय तुळशीची पाने वाटून चंदनाच्या लेपाबरोबर डोक्यावर लावणेही उत्तम!

दुसरे म्हणजे सर्दी-पडसं [ Cough remedy ] हा अतिशय लहान आजार आहे; पण यामुळे अनेकजण हैराण होतात. तुळशीच्या मदतीने सर्दी-पडश्याला बरं करण्यासोबतच त्यापासून कायमची सुटका देखील मिळवता येते. तुळशीतील ‘अँटीस्पास्मोडीक’ घटक सर्दी-पडश्यापासून मुक्तता मिळवून देतात. ही बहुगुणी तुळस तापासाठी देखील उपयुक्त मानली जाते. तापाची तीव्रता अधिक असल्यास अर्धा लीटर पाण्यात वेलची पावडर, साखर आणि दूध याबरोबर तुळशीची पाने उकळून घ्यावी. तीन तासांच्या अंतराने हा काढा रुग्णाला दिल्यास ताप कमी होतो. यासोबतच तुळशी, काळेमिरे आणि खडीसाखर मिसळून प्यायल्यानेही सर्दी-पडसे ठिक होते. सध्या आपल्यावर आलेल्या कोरोना संकटाला रोखून धरण्यात तुळशीची पाने सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

(केवळ माहितीस्तव, छायाचित्र प्रतिकात्मक)