Home राजधानी मुंबई भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गर्दी न करता साधेपणाने साजरी व्हावी,...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गर्दी न करता साधेपणाने साजरी व्हावी, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

61

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता घराघरातूनच डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाच्या निमित्ताने ते एका बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. गर्दी न करता विविध समाजोपयोगी उपक्रमांनी जयंती साजरी करता येईल. रक्तदान शिबीरांचे आयोजन करता येईल.
त्यासाठी आरोग्य विभाग आणि शासनाच्या सर्व यंत्रणांनी पुरेशी खबरदारी आणि पूर्व नियोजन करणे आवश्यक आहे, असे सांगून त्याबाबतचे निर्देशही संबंधित यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.