Home नागपूर आदित्य हिरोतर्फे मनपा डॉक्टरांना ३०० पीपीई किट भेट

आदित्य हिरोतर्फे मनपा डॉक्टरांना ३०० पीपीई किट भेट

9

नागपूर : सध्या नागपूर शहरात कोरोनाविरोधात डॉक्टर्स महत्तवाची भूमिका बजावत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस कोरोना रुग्णांना सेवा देत आहेत. त्यांना सुरक्षा मिळावी यासाठी हिरो मोटो कॉर्प सीएसआर प्रोग्राम अंतर्गत कंपनीच्या वतीने आदित्य हिरो [ aaditya hero] यांच्या वतीने नागपूर महानगरपालिकेच्या डॉक्टर व आरोग्य सेवेतील कर्मचाºयांकरिता ३०० पीपीई किट मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे सुपूर्द केल्या.

यावेळी पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे, वरिष्ठ क्षेत्र व्यवस्थापक निलेश बोरडे, आदित्य आॅटो एजन्सीचे डॉ. प्रकाश जैन उपस्थित होते.

यापूर्वीही आदित्य हिरोतर्फे शहरात वाढत्या कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेत हजारो मास्क आणि तीन मोबिक रुग्णवाहिका दिल्या होत्या. आणि आता कोरोना रुग्णांना सेवा देत असलेल्या डॉक्टरांसाठी ३०० पीपीई किट दिल्या आहेत. याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी विशेष पुढाकार घेतला होता. महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी एचएमसीएल आणि आदित्य आॅटो एजन्सीचे डॉ आदित्य जैन यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here