Home उपराजधानी नागपूर कठीण काळात प्लाज्मादानासाठी जास्तीत दात्यांची गरज

कठीण काळात प्लाज्मादानासाठी जास्तीत दात्यांची गरज

47

नागपूर : शहरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाज्मा थेरेपी अधीक प्रभावी आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या दात्यांनी जास्तीत जास्त संख्येने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरबीडी प्लाज्मा बँक व लाईफ लाईन ब्लड बँकेचे मेडिकल डायरेक्टर डॉ. हरिश वरभे यांनी केले.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते.
त्यांनी कोव्हिड आर.बी.डी. प्लाज्मादान, कोरोना व्हॅक्सीन, अँटीबॉडी टेस्टींग या विषयांवर संवाद साधला.

डॉ. हरिश वरभे म्हणाले, की सध्याच्या घडीला प्लाज्मा दान करणे खूप श्रेष्ठदान आहे. यामुळे अनेक कोरोना रुग्णांचे प्राण वाचविल्या जाते. अशा रुग्णांसाठी प्लाज्मा संजिवनी आहे असा विश्वास दात्याला पटवून देणे गरजेचे आहे. यासाठी जनजागृती, प्रबोधन आणि दात्याला प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

सध्या कोरोना पूर्णपणे बरा करण्यासाठी कोणतीही औषधी तयार झालेली नाही. त्यामुळे सध्या कोरोना रुग्णाला लवकर बरे करण्यासाठी प्लाज्मा थेरेपी प्रभावी उपचार पद्धती आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला योग्य वेळेत योग्य डोस दिल्यास ते अधिक परिणामकारक ठरते. म्हणूनच कोणत्याही औषधीपेक्षा प्लाज्मा थेरेपीचा उपचार कधीही चांगली पद्धत असल्याचे डॉ. हरिश वरभे [ DR HARISH VARABHE ] यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here