भरत्या बेंबीला गाठ मारून बोलला…

टपोरी टुरकी ....Jocks for You

विन्या : बाबा, मला गाडी घेऊन द्या.
वडील : देवानं, दोन पाय कशाला दिलेत…!
विन्या : एक किक मारायला आणि एक गिअर बदलायला.
.
.
.
बापानं लय हानला विन्याला…

***

छावी आणि बाबी दोघी बोलत असतात.
.
.
.
छावी : सांग पाहू असा कोणता पदार्थ आहे जो फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही गरम राहतो.
.
.
.
बाबी : नाही रे… तूच सांग.
.
.
.
छावी : ‘गरम’ मसाला.

***

भरत्या जोराजोरात आणि तावातावातही बोलत होता़
…ते,नव्हे,मी काय म्हणतोय ? त्या बुलेट ट्रेनमध्ये विनातिकिट सापडलं तर कसं!
मित्र : तर काय?
भरत्या बेंबीला गाठ मारून बोलला, तर आपल्याला भारतातल्या जेलमध्ये ठेवणार का जपानला हाकलणार?
काही दिवसांपासून भरत्या पासपोर्टच्या कार्यालयाभोवती फेºया मारतोया…

***

मला एक कळत नाही की, श्रीमंत मित्रांच्या बरोबर मैत्री केली तर आपण श्रीमंत होत नाही !
सेम तसंच़…
हुशार मित्रांच्या बरोबर मैत्री केली की आपण हुशार होत नाही! पण…दारूड्या मित्राबरोबर मैत्री केली की आपण पण दारूडे कसे होतो?

***

मुंबईकर : तुम्ही उकडत असल्यास काय करता ?
पुणेकर : आम्ही कूलरसमोर बसतो!
मुंबईकर : तरीही उकडत असेल तर…
पुणेकर : मग आम्ही कूलर चालू करतो…

*****

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *