Home राजधानी मुंबई इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेशिवाय पुढील वर्गात पाठवण्याचा...

इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेशिवाय पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय

32

मुंबई : राज्यातली कोरोनाची स्थिती पाहता इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षाशिवाय पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड [ minister varsha gaikwad ] यांनी निर्णयाची घोषणा केली आहे.

मागील सव्वा वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. चालू शैक्षणिक सत्र (2020-21) सुरूच करता आले नाही, तर त्यापूर्वीच्या सत्रात (2019-20) परीक्षा पूर्णपणे घेता आल्या नाहीत़ त्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून, सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक हक्क कायद्यानुसार पुढील वर्षांत प्रवेशित केले आहे. त्यानंतर आता इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेशिवाय पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय इयत्ता दहावी आणि बारावीच्या मंडळांच्या परीक्षांबाबतचा निर्णय येत्या काही दिवसात घेतला जाईल. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या.