Home उपराजधानी नागपूर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान, मुख्यमंत्री यांची आदरांजली

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान, मुख्यमंत्री यांची आदरांजली

21

नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि इतर मान्यवरांनी आज महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली.

महात्मा फुले हे थोर विचारवंत, तत्वज्ञ, मानववंश शास्त्रज्ञ आणि लेखक होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य महिलांच्या शिक्षण आणि सक्षमिकरणासाठी वाहून घेतले होते. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत, त्यांची बांधिलकी आणि समर्पण भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहिले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महात्मा फुले यांचे विचार, कार्यकर्तृत्व आजच्या परिस्थितीतही मार्गदर्शक आहेत. त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही मूल्ये रुजवण्यासाठी आयुष्य वेचले.

अनिष्ट रुढी-प्रथामुक्त आणि शोषणमुक्त समाजाचा आग्रह धरला. स्त्री-शिक्षणासह विविध सामाजिक सुधारणांसाठी क्रांतीकारी पावलं उचलतानाच महात्मा फुले यांनी शेती-सिंचन, औद्योगिक आणि पायाभूत विकासक्षेत्रातही कृतीशील योगदानाचा आदर्श उभा केला. त्यांच्या या मार्गदर्शनानुसार वाटचाल करण्यासाठी आपणही वचनबद्ध होऊया, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महात्मा फुले यांना अभिवादन केले. महात्मा ज्योतीबा फुले खºया अर्थाने क्रांतीसूर्य होते. त्यांच्या प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी, सत्यशोधक विचारांवर आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे,अशा शब्दांत त्यांनी आदरांजली वाहिली. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही महात्मा फुले यांनी आदरांजली वाहिली आहे. मुलींची पहिली शाळा काढून देशात महिलांच्या शिक्षणाचा पाया महात्मा फुले यांनी रचल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here