Home राजधानी मुंबई …तर राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन राहील

…तर राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन राहील

53
file photo

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी, सर्वांची सहमती मिळाली तर, १५ दिवसांचा ‘लॉकडाऊन’ राहू शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे [ health minister rajesh tope ] यांनी दिली आहे.

लॉकडाऊनचा निर्णय झाला तरी तो आज किंवा उद्या तातडीने लावला जाणार नाही, आधी त्यासाठीचे संपूर्ण नियोजन केले जाईल आणि मगच त्यासंबंधी घोषणा केली जाईल.
राज्यात लॉकडाऊन लागलेला नाही, तर त्यावर केवळ गांभीर्याने विचार सुरू आहे. त्यामुळे बाहेरच्या राज्यातून आलेल्या कामगारांनी घाबरू नय. आपल्या गावी जाण्याची घाई करू नये, असे आवाहनही टोपे यांनी केले.