Home राजधानी मुंबई शरद पवार यांच्यावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया

शरद पवार यांच्यावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया

21

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार [ NCP SUPREMO SHARAD PAWAR ] यांच्या पित्ताशयावर आज यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तसेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे.

शरद पवार यांना 30 मार्चला पोटात दुखत असल्यामुळे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आठवडाभर विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता. त्यानंतर 15 दिवसांनी आज त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे शरद पवारांना रविवारी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांची तब्येत स्थिर असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here