Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक,गरजूंना कोविड लसीकरणासाठी मदत करा : पंतप्रधान

ज्येष्ठ नागरिक,गरजूंना कोविड लसीकरणासाठी मदत करा : पंतप्रधान

21

नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिक आणि गरजूंना कोविड लसीकरणासाठी मदत करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी [ PM NARANDRA MODI ON LAS MAHOTSAV] यांनी देशातील युवकांना केले आहे.

कोरोनाविरुद्धचा लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण उत्सवाला रविवारपासून प्रारंभ करण्यात आला. महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंती दिनी सुरू झालेला हा देशव्यापी लसीकरण उत्सव १४ एप्रिल म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवाचा प्रारंभ करताना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आणि ज्येष्ठ नागरिक तसेच गरजूंना कोविड लसीकरणासाठी नाव नोंदणीत मदत करण्याचं आवाहन युवकांना केले आहे.

पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये़ कोरोना संबंधीचे नियम पाळावेत. कुटुंबातील महिलांनी घरातील प्रत्येक पात्र लाभार्थी लस घेईल यांची जबाबदारी घ्यावी, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here