Home ब्लॉग मातीआड गेलेला जीव परत येणार कसा…

मातीआड गेलेला जीव परत येणार कसा…

109

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसºया लाटेमुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे कडक निर्बंध किंवा ‘लॉकडाऊन’ लावण्याची तयारी पूर्ण झाली आहे. एकीकडे सरकारला संसर्गाच्या चिंतेने घोर लावला आहे, दुसरीकडे आपल्यापैकी अनेकजण बिनधास्त आहेत़ कारण ते कोरोनासंबंधी नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. अगदी निर्लज्जपणे काहीही काम नसताना घराबाहेर फिरत आहेत़

याचदरम्यान अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूबाबत केलेल्या अभ्यासानुसार एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणू हा पृष्ठभागावरून पसरण्याचा धोका हा खूपच कमी असल्याचे अमेरिकेतील ‘सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’( CDC ) च्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कदाचित 10 हजारांपैकी एखादे प्रकरण असेल, ज्यात कोरोना पृष्ठभागावरून पसरतो. त्यामुळे पृष्ठभागावरून कोरोना पसरेल याबाबत फार घाबरू नका, असे सीडीसीने म्हटले़ सीडीसीनुसार कोरोना विषाणू पसरण्याचा मुख्य मार्ग हा पृष्ठभाग नसून थेट संपर्क आहे. म्हणजे एकमेकांच्या संपर्कात आल्यानेच हा विषाणू पसरतो. यावरूनच गर्दी टाळणे शारीरिक दूरता राखणे ( SOCIAL DISTINCING ) आणि मुखाच्छादन ( MASK ) महत्त्वाचे आहे हे दिसून येते. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी गोष्टींचे भान राखणे आणि त्यांचे पालन करायलाच हवे; परंतु आपण काय केले? या प्रश्नाचे उत्तर आपल्याजवळ आहे का? होय, आहे…मात्र, ते बेशर्मपणाचे आहे़ कारण आपण लोकहिताच्या, समाजहिताच्या गोष्टी केल्याच नाहीत़ समाजद्रोही कृत्ये केलीत आपण सरकारच्या आदेशाचे पालन न करून. कोरोनाची साखळी तोडायची असेल, तर आपल्या तीन गोष्टी पाळायच्या होत्या. केंद्र आणि राज्य सरकारच्या त्या वारंवार आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला होता.

1. वारंवार हात धुणे
2. शारीरिक दूरता टाळणे
3. मुखावरण वापरणे

आपण मात्र यापैकी तिन्ही नियमांचे पालन केले नाही़ वारंवार हात धुण्यासाठी आपणांस वेळ मिळाला नाही़ मात्र, घराबाहेर, भररस्त्यात थुंकण्यास मात्र कसर सोडली नाही़ अगदी दुचाकी वा चारचाकी चालवत असतानाही रस्त्यावर थुंकण्याचे कर्तव्य (निर्लज्ज) पार पाडले. दुसºया क्रमांकाची जबाबदारी पार पाडण्यात कमी पडलो़ कारण गर्दी तयार करणे आणि त्यात मिसळण्याचा हव्यास सुटला नाही़ लग्नसोहळ्यातही हजेरी लावली आणि म्हणून कित्येकांना प्राणास मुकावे लागले.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, पहाटे आणि रात्री फिरण्याचेही इतिकर्तव्य पार पाडत आहोत. रात्रीची संचारबंदी सुरू आहे, याबाबीचाही आपणास विसर पडला़ अनेकजण विना मुखाच्छादन घराबाहेर पडत आहे़ अगदी लहान तीन ते चार वर्षांच्या बाळासह एखादे जोडपे बाहेर पडत असल्याचे पाहण्यात येते. हेच आपले आपले समाजाप्रति कर्तव्य किंवा जबाबदारी़?

मित्रांनो, एकदा मातीआड गेलेला परत येत नाही, तो डोळ्यांनी दिसत नाही, हे शाश्वस्त आपण नाकारतोच कसे? कारण मागील एक वर्षाच्या काळात अनेकांच्या घरात कोरोना आजाराने मृत्यू झाला किंवा मृत्यू झालेत़़़अगदी सहा-सहाजणांना कायम निरोप द्यावा लागला आहे़ मागील वर्षी झारखंड राज्यात एक आई आणि तिच्या पाच मुलांचा केवळ 15 दिवसांच्या फरकाने मृत्यू झाला आहे़ महाराष्ट्रातील जळगांव जिल्ह्यात अगदी कालपरवा एका घरात चार लोकांना मातीआड जावे लागले आहे़ कुणाच्या घरात दोन तर कुणाच्या घरात तिघांना एकाच सरणावर रचावे लागले. असे का झाले किंवा का व्हावे?

संजय मुंदलकर

 

हे सुद्धा वाचा

जगातील ‘या’ गावात केवळ मुलीच जन्मास येतात…

तुमची आमची चहावाली येतेय राजकारणात..