Home राजधानी मुंबई कोरोना ब्रेक द चेन, राज्यात 15 दिवस संचारबंदी

कोरोना ब्रेक द चेन, राज्यात 15 दिवस संचारबंदी

80

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून संपूर्ण राज्यात 15 दिवस संचारबंदी लावण्यात आली आहे. उद्या बुधवारी रात्री आठ वाजतापासून कडक निर्बंध घातले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री साडेआठ वाजतापासून जवळपास 50 मिनिटे जनतेशी संवाद साधला़ यात त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या सेवा आणि त्याशी संबंधित उद्योग सुरू असतील,असे सांगितले.

महत्त्वाच्या बाबी
– सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सार्वजनिक वाहतूक सुरू
– कारण नसताना घराबाहेर पडल्यास कारवाई होणार
– उद्या रात्री 8 वाजल्यापासून निर्बंध लागू
– पुढील १५ दिवस संचारबंदी
– अनावश्यक ये-जा पूर्णत: बंद
– आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडायचे नाही
– अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद
-सार्वजनिक वाहतूक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांनाच वापरता येणार
– वैद्यकीय सेवा, लस उत्पादक, वैद्यकीय वाहतूक, वैद्यकीय साहित्य वाहतूक सुरू राहणार
– शीतगृह, जनावरांचे दवाखाने, शेतीची कामे सुरू राहतील
– बँका, आर्थिक संस्था सुरू राहणार
– बांधकामे सुरू राहणार. मात्र, मजूर आणि कर्मचाºयांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी लागणार
– हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद;परंतु ‘होम डिलिव्हरी’ सुरू ठेवता येणार
– रस्त्यावरील खाद्यपदार्थ सेवा सुरू राहणार
– लाभार्थ्यांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदुळ एक महिना मोफत
– सात कोटी लोकांना मोफत धान्य
– अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना परवानगी