Home राष्ट्रीय सुशील चंद्र नवे मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्त

सुशील चंद्र नवे मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्त

30

नवी दिल्ली : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त [ CEC ] म्हणून सुशील चंद्र यांनी आज पदभार स्वीकारला.

मावळते मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते 12 एप्रिल 2021 रोजी सेवामुक्त झाले. सुशील चंद्र [ SUSHEEL CHANDRA ] हे 15 फेब्रुवारी 2019 पासून आयोगामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. 18 फेब्रुवारी 2019 पासून ते मतदारसंघ पुनर्रचना आयोगाचे सदस्य म्हणूनही काम करत आहेत. जम्मू काश्मीर केंद्रसशासित प्रदेशाच्या मतदारसंघ पुनर्रचनेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी तब्बल 39 वर्षांपासून प्राप्तिकर विभागात विविध पदांच्या जबाबदाºया सांभाळल्या असून, 1 नोव्हेंबर 2016 ते14 फेब्रुवारी 2019 या काळात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे [ CTBT ]  अध्यक्षही होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here