Home राजधानी मुंबई ‘ब्रेक द चेन’ काळात राज्य सरकारकडून ५ हजार ४७६ कोटी रुपयांचे पॅकेज

‘ब्रेक द चेन’ काळात राज्य सरकारकडून ५ हजार ४७६ कोटी रुपयांचे पॅकेज

47

मुंबई : कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा केली असून, या काळात आर्थिक दुर्बल घटकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेजही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी १५०० रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल. आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रतिकुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. राज्यातील नोंदणीकृत सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद केली असून, सुमारे पाच लाख फेरीवाल्यांच्या खात्यात प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य जमा करण्यात येणार आहे

मातीआड गेलेला जीव परत येणार कसा…

अन्न सुरक्षा योजनेच्या सात कोटी लाभार्थ्यांना एक महिना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ मोफत देणार असून, याशिवाय शिवभोजन थाळी मोफत मिळणार आहे. विविध निवृत्तीवेतन योजनेतील सुमारे ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

टाळेबंदीच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य पुरवठा करण्यासह आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठीशी उभे राहण्याची तसेच, या काळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ cm udhhav thakare ] यांनी यावेळी दिली.

दरम्यान, लष्करी तज्ज्ञांच्या मदतीने हवाई वाहतुकीने आॅक्सिजन आणणे शक्य आहे का आणि शक्य असेल, तर नुसती परवानगी नव्हे, तर हवाई दलाला सांगून मदत करायचे आदेश द्यावेत, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

हे सुद्धा वाचा :

मंत्री छगन भुजबळांनी पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी

मुंबईत महिलांसाठी म्हाडा उभारणार सुसज्ज वसतिगृह : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड