Home राजपाट गोवा फॉरवर्ड पार्टी एनडीएतून बाहेर पडणार

गोवा फॉरवर्ड पार्टी एनडीएतून बाहेर पडणार

25

पणजी : भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ( NDA ) एक मोठा धक्का बसला आहे. गोवा राज्यात सहयोगी पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीने (जीएफपी) एनडीए सोडण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे याबाबत माहिती दिल्याचे वृत्त आहे.

गोवा राज्यात भाजपाला गोवा फॉरवर्ड पार्टीने [ GOA FORWARD PARTY ] पाठिंबा दिला होता. मात्र, 2019 पासूनच दोन्ही पक्षांत मतमतांतरे दिसून येत होती. जीएफपीच्या नेत्यांनी सरकारवर अनेक आरोप केले होते. विजय सरदेसाई [ vijay sardesai ] यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वातील सरकारचे अनेक नियम राज्याच्या हिताचे नसल्याचे म्हटले होते.

दरम्यान, पुढील 2022 मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याने ही बाब भाजपासाठी अडचणींची ठरणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here