Home टपोरी टुरकी ....Jocks for You बायकोनं पाठीत जोरदार रट्टा दिला. म्हणाली, ती बया खिडकीची काच पुसतेय…

बायकोनं पाठीत जोरदार रट्टा दिला. म्हणाली, ती बया खिडकीची काच पुसतेय…

84
marathi jockes for every body...

 

अभिलाषा : त्रिदेव मध्ये तीन अभिनेत्री होत्या. त्यांची नावं सांगाल जरा…
जय : माधुरी, संगीता बिजलानी आणि सोनम
अभिलाषा : २००३ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरोधात सचिन तेंडुलकरने किती धावा केल्या होत्या?
जय : ९८ धावा
अभिलाषा : आपल्या बाजूची तनू आपल्या बिल्डिंगमध्ये कधी राहायला आली?
जय : अगं, रविवारी तिला दोन महिने पूर्ण होतील. पण, तू असे का प्रश्न विचारतेस?
अभिलाषा : आज माझा वाढदिवस आहे.
.
.
.
आणि भयाण शांतता पसरली. बिच्चारा जय न जेवताच कार्यालयात गेला.

***

नवी नवरी प्रिया सासूच्या पाया पडते…
सासू : सदा सुखी राहा.
प्रिया : पण तुम्ही राहू देणार का?

***

समोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच मिनिटं हात हलवत होती.
मग काय बंट्यानंही हात वर केला…
तेवढ्यात बायकोनं पाठीत जोरदार रट्टा दिला.
म्हणाली, ती बया खिडकीची काच पुसतेय.

***

आरशापुढं उभी असलेल्या रेखानं पती देवाला विचारलं, अहो, मी खूप जाड दिसते का?
देवानं वाद टाळण्यासाठी सांगितलं, छे मुळीच नाही.
रेखाला आनंद झाला. रोमँटिक होऊन म्हणाली, ठीक आहे. मग मला आपल्या दोन्ही हातांनी बाहुपाशात घेऊन फ्रीजजवळ न्या, मी आईस्क्रीम खाईन…
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून देवा म्हणाला, थांब, रेखा मी फ्रीजच आणतो इकडं.

***

बायकोला कधी  येडी  आहेस असे कधी म्हणू नका. कारण बायको पण कधीही जुन्या प्रकरणा (…णां) ची चौकशी लावू शकते.

***

यम : मित्रा मी आलोय…
विठ्ठल : पण, मी तर एकदम फिट्ट आहे.
यम : तू मोबाईल लॉक न करताच घरी विसरला आहेस. तुझी बायको आता तो उघडून पाहत आहे.
विठ्ठल : निघुया का मग आपण…

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here