Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य शांती आणि मंदिरा…

शांती आणि मंदिरा…

93

मंदिरा बेदी फारशी चित्रपटांतून दिसली नसली तरी दूरचित्रवाणीवरील आहट, औरत, घर जमाई, क्यों की सास भी कभी बहू थी अशा मालिकांमध्ये तिच्या भूमिकांचे कौतुकच झाले. मात्र, पदार्पणातील ‘शांती’ मालिकेतील अभिनयाने तिला मोठी संधी मिळाली.

1994 मध्ये दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या ‘शांती’ तून मंदिराने [ mandira bedi] करिअरला सुरुवात केली. या मालिकाने सुमारे 780 भाग पूर्ण केले़ त्यावेळी ही मालिका ‘मेगा सीरिअल’ म्हणून मानल्या गेली. यात यतिन कार्येकर, सुप्रिया कर्णिक, ज्योत्स्ना कार्येकर, सुनिल शेंडे, सुकन्या कुलकर्णी, सुमुखी पेंडसे, अश्विनी कळसेकर, इरावती हर्षे या मराठी कलाकारांसह अमर तलवार, अमित बहल, अमन वर्मा, सुशील पाराशर, अनिता कंवल अशा कलाकारांचा समावेश होता.

भारतीय टीव्हीवरची दीर्घकाळ चाललेली मालिका असा शांतीचा उल्लेख केला जातो. यात मुख्य व्यक्तिरेखा ‘शांती’ मंदिराने साकारली होती. शांत, संयमी, सालस मुलीची भूमिका तिने उत्तम वठवली. त्या केबलच्या दिवसांतील महिलाप्रधान मालिकांचा पाया ‘शांती’ने रचला असे म्हणता येईल.

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक हिट चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ यातही मंदिराची लहानशी भूमिका होती. क्रिकेटची आवड असलेल्या मंदिराने क्रिकेटमधील बारकावे सांगण्यासाठी क्रिकेट मैदानावर समालोचन सुद्धा केले आहे. काल गुरुवारी तिने आपला वाढदिवस साजरा केला आहे.