Home राष्ट्रीय यंदाच्या वर्सात देशात 96टक्के ते 104 टक्के पाऊस…

यंदाच्या वर्सात देशात 96टक्के ते 104 टक्के पाऊस…

81

नवी दिल्ली : देशाच्या हवामान खात्याने ( I M D ) पहिला मान्सून अंदाज जाहीर केला असून, यावर्षी 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंत पाऊस [ 96% TO 104 % IN INDIA IN CURRENT YEAR ] राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जून ते सप्टेंबर या हंगामात दीर्घकालीन पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही ‘आयएमडी’ म्हटले आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे ( EARTH SCIENCE MINISTRY ) सचिव राजीवन यांच्यानुसार, नैऋत्य मान्सूनमध्ये दीर्घकालीन सरासरीनुसार 98 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी मान्सून सामान्य राहील. ही देशासाठी चांगली बाब असून, कृषी क्षेत्रासाठी आनंदाची गोष्ट आहे.

ओडिशा, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यात सामान्यापेक्षा कमी तर देशातील उर्वरित भागात सामान्य ते सामान्यापेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. यंदा देशात मान्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीच्या 98 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज आहे. मागील दोन वर्षांपासून देशात सामान्यापेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. ला निना आणि एल निनोचा भारतीय मान्सूनच्या वाटचालीवर मोठा परिणाम होत असतो. यंदा एल निनोच्या प्रभावाची शक्यता कमी असल्याचे राजीवन म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीने मान्सूनची वाटचाल महत्त्वपूर्ण मानली जाते. शिवाय ही बाब अर्थव्यवस्थेवरही परिणामकारक दिसून येते.

महाराष्ट्र आघाडीवर
यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. महाराष्ट्रात मागील वर्षीही चांगला पाऊस पडला होता. यंदा त्याहूनही चांगली परिस्थिती आहे. शिवाय दुष्काळी भागांनाही याचा चांगला फायदा होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here