Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

35

सोलापूर : मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठीचे [ vidhansabha bypoll ] मतदान सुरू असून, कोरोनाविषयक सर्व नियम पाळण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

मतदारसंघातील 524 केंद्रावर सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान होणार असून, 3 लाख 40 हजार 889 मतदार 19 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. प्रमुख उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके तर भाजपाकडून समाधान औताडे यांच्या प्रमुख टक्कर आहे.

दरम्यान,राज्यात सध्या सुरू असलेल्या कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचे मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाºया नागरिकांना मतदानासाठी प्रवास करून मतदारसंघात प्रवेश देण्याच्या सूचना राज्य शासनाने प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here