Home राजधानी मुंबई महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेतून आॅक्सिजन वाहतुकीची परवानगी मिळावी

महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेतून आॅक्सिजन वाहतुकीची परवानगी मिळावी

32

मुंबई : महाराष्ट्रातील आॅक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे आॅक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसिविर तयार करण्यास मान्यता द्यावी़ राज्यात दररोज 8 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन ( dr harsh vardhan) यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या ( vdo conferencing ) माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी माहिती देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी आॅक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली.

रस्तेमार्गे आॅक्सिजन वाहतुकीचा कालावधी वाढत असल्याने रेल्वेच्या माध्यमातून त्याची वाहतूक करण्यात यावी यासाठी केंद्र्र शासनाने रेल्वे विभागाला निर्देश देण्याची मागणी केली. हवेतून आॅक्सिजन ( oxygen from air ) शोषून तो रुग्णांना देणाºया यंत्रांचे वाटप केंद्र शासनाच्या माध्यमातून केले जाणार आहे. देशभरात 132 प्लान्ट देण्यात येणार असून महाराष्ट्रातील स्थिती लक्षता घेता त्यातील जास्तीत जास्त प्लान्ट महाराष्ट्राला मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे. रेमडेसिवीरवरील निर्यात बंदीमुळे 15 कंपन्यांच्या आहे जो साठा शिल्लक आहे त्यातील जास्तीत जास्त महाराष्ट्राला मिळावा, अशी मागणी केल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

कोरोना विषाणूची जनुकीय संरचना बदलली का याच्या तपासणीसाठी महाराष्ट्रातील काही नमुने पाठविण्यात आले आहे. त्यातील 1100 पैकी 500 नमुन्यांची तपासणी झाली असून त्याविषयी सविस्तर अहवाल केंद्र्र शासनाकडून दिला जाणार आहे. सर्वात जास्त संसर्ग करण्याची क्षमता या विषाणूत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र, याविषयी सविस्तर माहिती संशोधनाअंती दिली जाणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे ( health minister rajesh tope ) यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here