Home राष्ट्रीय ब्रेकिंग न्यूज कोरोना परिस्थितीबद्दल डॉ. मनमोहनसिंग यांचे मोदींना पत्र

कोरोना परिस्थितीबद्दल डॉ. मनमोहनसिंग यांचे मोदींना पत्र

41

नवी दिल्ली : देशात कोविड महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग [ dr. manmohan singh ] यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी [ pm narendra modi] यांना पत्र लिहिले आहे.

कोरोना महामारीच्या संकटाशी सामना करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं हाच नेमका उपाय आहे. केवळ किती जणांना लस दिली यापेक्षा किती टक्के लोकसंख्येला लसीचं संरक्षण मिळाले हे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक आरोग्याबाबत सध्याची परिस्थिती आणीबाणीची असून लस उत्पादकांना निधी आणि इतर सहाय्य सरकारने करावे, अशा सूचना डॉ. सिंग यांनी केल्या आहेत.

 

***

वैद्यकीय आॅक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी
रेल्वे ‘आॅक्सिजन एक्सप्रेस’ सोडणार

मुंबई : वैद्यकीय आॅक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी रेल्वे विभाग ‘आॅक्सिजन एक्सप्रेस’ [ oxygen express ]  गाड्या सोडणार आहे.
राज्यात आॅक्सिजनचा पुरवठा विनाअडथळा व्हावा याकरता सिलेंडर्स आणि द्रवरुप आॅक्सिजनची वाहतूक रेल्वेने करता येईल का अशी विनंती राज्य शासनाने केली होती. त्यानुसार मुंबईजवळील कळंबोली आणि बोईसर स्थानकांमध्ये रिकामे टँकर चढवून ते विशाखापट्टण, बोकारो, राउरकेला किंवा जमशेदपूरला रवाना होतील. भरलेले टँकर याच स्थानकांवर उतरतील. यानंतर रो-रो पद्धतीने ही वाहतूक होईल.
कळंवोली स्थानकावर मागील गुरुवारी तर बोईसरला रविवारी टँकर गाडीत चढवण्याची तालीम घेण्यात आली. १९ एप्रिला १० टँकर्सचा पहिला जत्था रवाना होईल. राज्याचे वाहतूक सचिव टँकर्स उपलब्ध करून देणार आहेत.

***

रेमडेसिविर औषधाच्या किंमतीत कपात

नवी दिल्ली : सरकारच्या हस्तक्षेपानंतर आता देशातील रेमडेसिविर इंजेक्शनच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय औषध दर प्राधिकरणाने याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले असून, सरकारच्या हस्तक्षेपानंतर बहुतांश औषधनिर्मात्या कंपन्यानी स्वत:च किमती कमी करत असल्याचे जाहीर केले.
कॅडिलाच्या रेमडॅकची किंमत आता ८९९ रुपये असेल सिनजिनचं रेमविन २,४५०, डॉ. रेड्डीजचे रेडीक्स २,७००, सिप्लाचे सिप्रेमी ३,०००, मायलानचे डिस्रेम ३,४००, ज्युबिलियंट जेनेरिक्सचे ज्युबी आर ३,४०० आणि हेटेरोचं कोविफॉर ३,४९० रुपयांना मिळणार आहे. या सर्व कंपन्यांनी आपल्या इंजेक्शनच्या किमती १,२०० ते २,५०० रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत.

*****

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here