Home उपराजधानी नागपूर नागपुरात संचारबंदी, मात्र काही महाभाग अजूनही रस्त्यांवरच…

नागपुरात संचारबंदी, मात्र काही महाभाग अजूनही रस्त्यांवरच…

44

नागपूर : विदर्भात प्रामुख्याने नागपुरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग उद्भवला असताना शहरातील अनेक महाभाग (समाजद्रोही वृत्तीचे लोक) शासन-प्रशासनाने तयार केलेले नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे़ यात संबंधितांनी अतिशय निर्लज्जतेचा कळस गाठल्याचा अनुभव येत आहे.
कोरोनाचा उद्र्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मोठी शहरे, खेडेगावात सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. ही साखळी तोडण्यासाठी सरकारने 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 30 एप्रिलच्या रात्रीपर्यंत राज्यभरात संचारबंदी घोषित केली. मात्र, यानंतरही काहीजण नियमांचे उल्लंघन करून गर्दी करत आहेत. त्यामुळे आता जीवनावश्यक गोष्टीवर निर्बंध येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली असली तरी
त्यातून काही सवलती देण्यात आल्या होत्या. यात स्टँड अलोन किराणा दुकाने, भाजीपाला फेरीवाले, फळ दुकाने यांचा त्यात समावेश होता़ आता मात्र या दुकानांवरही मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी त्यात वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार पाहता कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार आणखी कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

बेपर्वाई आणि निर्लज्जपणा
संपूर्ण राज्यात संचारबंदी असताना अनेक महाभाग (यात पुरुष, महिला, तरुण-तरुणी) रस्त्यांवर फिरत असल्याचे दिसून आले आहे. पहाटे आणि रात्री जेवणानंतर शहरातील अगदी मुख्य रस्त्यांवर फिरत असल्याचे ‘अभिवृृत्त’ प्रतिनिधीला आढळले. एक महाभाग दोन-दोन कुत्र्यांसह नागपुरात रिंगरोडवर फिरत असल्याचे दिसून आले़ धक्कादायक दोन तरुण आपल्या बोटात मुखावरण (मास्क) अडकवून फिरत होते. एक जोडपे आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्यासह याच रिंगरोडवर पाहावयास मिळाले़ एक तरुणी आपल्या आईसोबत फिरत होती़ या सर्वांना कोरोना संकटाची जाणीव नसावी काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय मेडिकल चौकाशेजारच्या एका मैदानात काहीजण बॅडमिंटन खेत असल्याचे या दरम्यान पाहावयास मिळाले. शासनाने मैदाने, बगिचे बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही याठिकाणी गर्दी होत आहे, हे विशेष.

हे सुद्धा वाचा :

महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेतून आॅक्सिजन वाहतुकीची परवानगी मिळावी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here