प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन

पश्चिम महाराष्ट्र

पुणे : प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे [ well known film director sumitra bhave] यांचे आज सकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या 78 वर्षांच्या होत्या.
माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून सुमित्रा भावे आजारी होत्या. उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांनी अंतिम श्वास घेतला.

सुमित्रा भावे यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. असंख्य चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सुमित्रा भावे मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी चित्रपट, लघुपट आणि दूरचित्रवाहिनी मालिकांची निर्मिती केली आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

बाई, चाकोरी, नितळ, दोघी, दहावी फ, देवराई, वास्तुपुरुष, कासव या चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन अशा दुहेरी भूमिका सुमित्रा भावे यांनी पार पाडल्या होत्या.

12 जानेवारी 1943 रोजी जन्मलेल्या सुमित्रा यांनी सुरुवातीच्या काळात विविध विषयांवरील शोधनिबंध तयार केले़ दिल्ली आकाशवाणीवर त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून काम केले आहे. याशिवाय सामाजिक संस्थामध्ये स्वयंसेवक म्हणूनही काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *