Home उपराजधानी नागपूर वर्धा येथील लॉयड स्टीलच्या परिसरात जम्बो हॉस्पिटल उभारणार

वर्धा येथील लॉयड स्टीलच्या परिसरात जम्बो हॉस्पिटल उभारणार

24

नागपूर : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी  वर्धा येथील लॉयड स्टील कंपनीच्या परिसरात ऑक्सिजन [ OXYGEN CYLINDER ] मोठया प्रमाणात उपलब्ध् होऊ शकतो. तज्ज्ञ चमुनी त्याठिकाणाची पाहणी केली असून तिथे जम्बो हॉस्पिटल उभारणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रेस क्लब येथील पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाचा वाढत्या संसर्गाला थांबविण्यासाठी  प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

मानकापूर येथील क्रीडा संकुलात शहरासाठी 800 ते 1000 बेडची क्षमता असलेले कोविड रूग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. महानिर्मितीच्या कोराडी,खापरखेडा येथील विदयुत केंद्रात ओझोन प्लांट आहे. ओझोन वायुतून ऑक्सिजन मिळविण्यासाठी येथे कॉम्प्रेसर बसविण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्ली, फरीदाबाद,चीन,  व अमेरिका सारख्या  देशांमध्ये संपर्क करण्यात आला आहे. यासाठी चीनच्या कंपनीशी बोलणे झाले असून हा प्रकल्प कार्यन्वित झाल्यास कोराडीतून एक हजार सिंलीडर ऑक्सिजन दररोज मिळणार असल्याचे त्यांनी  सांगितले.

कॉम्प्रेसर बसविल्यानंतर खापरखेडा केंद्रातून दररोज 300 सिलिंडर ऑक्सिजन मिळू शकतो. मात्र कॉम्प्रेसर बसविण्यासाठी साधारणत: एक महिना लागू शकतो. प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करत असून  हिंगणा  एमआयडीसी परिसरातील ऑक्सिजन प्लांटची तपासणी केली मात्र त्याची उत्पादन क्षमता कमी आहे. पाचपावली कोविड केअर सेंटर मध्ये पीएम केअर फंडातून [ PM CARE FUND ] ऑक्सिजन टँकची निर्मिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तातडीची योजना म्हणून दररोज 4 टॅंकर ऑक्सिजन  उपलब्ध करून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

सद्यस्थितीत शक्य असेल तिथून ऑक्सिजन  उपलब्ध करण्यात येत असून दीर्घकालीन योजनांसाठी मोठया क्षमतेचे प्लांट उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा येथील श्री. क्षीरसागर यांच्या कंपनीला रेमेडीसीवीर उत्पादनाचे लायसन्स मिळाले आहे. प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्यास 10 मे पर्यतचा वेळ लागू  शकेल,असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here