Home राजधानी मुंबई मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या ‘या’ निर्णयाबद्दल मानले आभार

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या ‘या’ निर्णयाबद्दल मानले आभार

60

मुंबई : काही दिवसांपूर्वीच मी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून 18 वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला, त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस द्यायचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. येत्या १ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी [ pm modi ] यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. हा लसीकरणाचा तिसरा टप्पा असेल.

लसीकरणाच्या या टप्प्यात लस उत्पादकांना आपले ५० टक्के उत्पादन केंद्र्र सरकारला द्यावे लागेल. तर उर्वरित ५० टक्के आधी निर्धारित केलेल्या किमतीवर राज्य सरकार तसेच, खुल्या बाजारात विकू शकता येईल असा निर्णयही या बैठकीत झाला. याअंतर्गत खाजगी रुग्णालयांना सरकारसाठी राखीव ठेवलेल्या ५० टक्के साठ्यानंतरच लस विकत घेता येईल.

हे सुद्धा वाचा :
 किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय
नागपुरात संचारबंदी, मात्र काही महाभाग अजूनही रस्त्यांवरच…