Home राजधानी मुंबई ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन

46

ठाणे : ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर याचे मंगळवारी ठाणे येथे कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. नांदलस्कर यांनी सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट तसेच मालिकांमधून अभिनय साकारला आहे.

सारे सज्जन, शेजारी शेजारी, हळद रुसली कुंकू हसले आणि इतर काही चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. महेश मांजरेकर यांच्या वास्तव चित्रपटातून नांदलस्कर यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. जिस देश में गंगा रहता है, तेरा मेरा साथ है, खाकी, हलचल, सिंघम या हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

दिलीप प्रभावळकर यांनी लोकप्रिय केलेले वासूची सासू हे नाटकही नव्याने रंगभूमीवर सादर झाले. यात प्रभावळकर यांची भूमिका नांदलस्कर यांना साकारायची संधी मिळाली. व्यावसायिक रंगभूमीवर अनेक नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना हसवले. नाना करते प्यार हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेले शेवटचे नाटक होते.