सुंदर, आकर्षक सोनल…

सिनेरंग ... चित्रपट / संगीत / नाटक / नृत्य

वाट्याला फारसे चित्रपट आले नसले तरी सोनल चौहानने [ Sonal Chauhan ] आपल्या अभिनयाची ओळख भारतीय चित्रपटसृष्टीला दिली आहे. ती अभिनेत्री आणि गायिकाही आहे. याशिवाय तिने मॉडेलिंग सुद्धा केले आहे. जन्नत चित्रपटातून तिने आपला अभिनय प्रवास सुरू केला. सोनलने हिंदीशिवाय कन्नड, तेलगु आणि तामिळ चित्रपटातील भूमिका साकारल्या आहेत. कैसे बताऊँ यात तिने केके सोबत पार्श्वगायनही केले आहे.

सोनल राजपूत परिवारातील असून, तिचे शिक्षण दिल्ली आणि नोएडामध्ये दिल्ली पब्लिक स्कूल [  Delhi Public School ] तसेच गार्गी महाविद्यालयात पूर्ण झाले आहे. शिक्षणानंतर सोनलने मॉडेलिंगमध्ये प्रयत्न सुरू केला़ यात तिला मिस वर्ल्ड टुरिझम हा सन्मान 2005 मध्ये मिळाला. याच वर्षी तिने मिस फेमिना इंडिया वर्ल्ड हा सन्मान हस्तगत केला.

जन्नत, रेनबो,चेलुवेए निन्ने नोडलु, बुड्ढा होगा तेरा बाप, द पॉवर, पहला सितारा, 3 जी, लिजेंड,पंडागा चेस्को, शेर, साईज जीरो, इंजी इदुप्पज्हगी, डिक्टेटर अशी तिच्या काही चित्रपटांची नावे आहेत.

16 मे हा तिचा वाढदिवस आहे.

 

(छायाचित्रे : इंटरनेट)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *