Home STAND ALONE PHOTO कर्तव्य आणि अतुलनीय साहसाबद्दल मयूर शेळके यांना ५० हजारांचे बक्षीस

कर्तव्य आणि अतुलनीय साहसाबद्दल मयूर शेळके यांना ५० हजारांचे बक्षीस

68

मुंबईजवळील वांगणी रेल्वेस्थानकावर अतुलनीय साहस दाखवणारे मयूर शेळके यांना रेल्वे मंत्रालयाच्या वतीने ५० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.

सोमवारी १९ एप्रिल २०२१ रोजी या रेल्वेस्थानकावर एक अंध लहान मुलगा घसरून रेल्वे रुळावर पडला होता. यावेळी रेल्वेस्थानकात पॉर्इंटमन म्हणून काम करणारे मयूर यांनी समोरून रेल्वेगाडी येत असतानाही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वेगाने धावत जात त्या मुलाचे प्राण वाचवले होते.