Home राष्ट्रीय १८ वर्षावरील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी २८ एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार

१८ वर्षावरील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी २८ एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार

44
file photo

नवी दिल्ली : देशातल्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठीची नोंदणी येत्या २८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी कोविन जीओव्ही इन या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या [ corona vaccination ] तिसºया टप्प्यात येत्या १ मेपासून लस दिली जाणार आहे. सर्व सरकारी लसीकरण केंद्र्रावर ही लस विनामूल्य दिली जाणार असून, त्या बरोबरच आरोग्य कर्मचारी आणि 45 वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण सुरू राहणार आहे. लस उत्पादन कंपन्यांना आपल्या उत्पादित लसींपैकी 50 टक्के लसींच्या मात्रा राज्य सरकारांना तसेच खुल्या बाजारात थेट विकण्याची मुभाही देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.